Manasvi Choudhary
श्वेता तिवारी ही टिव्हीच्या सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे. वयाची चाळीशी पार केली तरी तिचं सौंदर्य चाहत्यांना वेड लावतय.
श्वेता तिवारी ही नेहमीच सुंदर दिसते. दोन मुलांची आई असूनही ती एकदम आणि फिट आणि तंदुरूस्त आहे.
नुकतेच सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर श्वेताने नवीन फोटो पोस्ट केले आहेत जे सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोशूटसाठी श्वेताने गुलाबी साडी नेसली आहे. साडीवर तिने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
कानात झुमके, गळ्यात हार, कपाळी टिकली असा तिचा सुंदर लूक चाहत्यांना घायाळ करतो आहे. अत्यंत स्टायलिश पोजमध्ये तिने फोटोशूट क्लिक केलं आहे.
या फोटोतील श्वेताच्या गालावरचं हास्य पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत. श्वेताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच तिचे वेस्टर्न आणि एथनिक फोटो शेअर करते. सोशल मीडियावर पर्सनललाईफविषयी चाहत्यांना अपडेट देते.
सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता तिवारी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते.