Shruti Vilas Kadam
श्वेता तिवारीने ब्लॅक रंगाचा स्टायलिश आउटफिट परिधान करत पुन्हा एकदा तिच्या फॅशन सेन्सची झलक दाखवली. साधेपणा आणि ग्लॅमरचा उत्तम मेळ तिच्या लूकमध्ये पाहायला मिळतो.
न्यूड मेकअप, चमकदार त्वचा आणि हलक्या टोनचा मेकअप तिच्या संपूर्ण लूकला अधिक आकर्षक बनवत होता.
मोकळे, सॉफ्ट वेव्ही केस आणि आत्मविश्वासपूर्ण पोझमुळे श्वेताचा लूक आणखी उठून दिसत होता.
दागिन्यांऐवजी साध्या आणि एलिगंट अॅक्सेसरीजची निवड करून तिने संपूर्ण लूक अधिक क्लासी ठेवला.
ब्लॅक आउटफिटमध्ये तिचा फिट लूक आणि आत्मविश्वास चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी तिच्या फिटनेसचंही कौतुक केलं.
तिचे फोटो व्हायरल होताच चाहते कमेंट्सचा वर्षाव केला. तिच्या स्टाइल, एलिगन्स आणि सौंदर्याचं अनेकांनी कौतुक केलं.
पार्टी, डिनर किंवा इव्हेंटसाठी ब्लॅक आउटफिट कसा स्टायलिश पद्धतीने कॅरी करावा, याचं उत्तम उदाहरण श्वेता तिवारीच्या या लूकमधून पाहायला मिळतं.