Priya More
टीव्ही अभिनेत्री श्रेनु पारिख नुकताच विवाहबंधनात अडकली. श्रेनुने तिचा बेटरहाफ अक्षय म्हात्रेसोबत २१ डिसेंबर २०२३ ला लग्न केले.
'इश्कबाज' या मालिकेमध्ये श्रेनुने 'गौरी'ची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे श्रेनु घराघरामध्ये पोहचली.
अक्षय म्हात्रे देखील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. मालिकेच्या सेटवर या दोघांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले.
अभिनेत्री श्रेनु पारीख आणि अक्षय म्हात्रे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
शाही थाटामध्ये पारंपारिक गुजराती पद्धतीने त्याचा विवाहसोहळा पार पडला. लग्नात दोघेही क्युट दिसत होते.
लग्नसोहळ्याला श्रेनु आणि अक्षयच्या कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. धुमधडाक्यात त्यांचे लग्न झाले.
दोघांनी देखील लग्नाचे फोटो इन्स्टावर शेअर करत कॅप्शनमध्ये 'टेकन फॉरेव्हर' असे लिहिले आहे.
श्रेनु लाल रंगाचा हिरेजडीत लेहेंगा परिधान केला होता. नववधूच्या रुपामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
तर अक्षयने श्रेनूच्या लेहेंग्याच्या कलरची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो खूपच हॅण्डसम दिसत होता.
सोशल मीडियावर श्रेनूचा लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून दोघांचेही चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना भावी आयु्ष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.