Priya More
बॉलिवूड चित्रपट निर्माता आनंद पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
आनंद पंडित यांच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावत आपल्या सौंदर्य आणि स्टाइलचा जलवा दाखवला.
'किंग खान'ने बर्थडे पार्टीला हजेरी लावली. त्याने ब्लॅक कलरचा ब्लेझर परिधान केला होता. फॉर्मल्समध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता.
अभिनेत्री काजोल स्काय ब्लू कलरच्या चमकदार साडीमध्ये अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती. तिच्याकडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
आनंद पंडित यांच्या पार्टीत बॉलिवूडची प्रसिद्ध पिता-पुत्राची जोडीही दिसली. या पार्टीत अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन सहभागी झाले होते.
अभिनेत्री मल्लिका शेरावत लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीचे या लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत.
या बर्थडे पार्टीसाठी वाणी कपूरने ऑल ब्लॅक लूक केला होता. ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये ती अप्रतिम दिसत होती.
बॉलिवूडचा 'दबंग खान' म्हणजेच सलमान खानही या पार्टीत सहभागी झाला होता. अभिनेत्याने ब्लॅक कलरचा ब्लेझर परिधान केला होता.
नुकताच विवाहबंधनामध्ये अडकलेले नवविवाहित जोडपे रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिनने देखील या पार्टीमध्ये हजेरी लावली.
अमिषा पटेलनेही आपल्या उपस्थितीने पार्टी अधिक सुंदर केली. अभिनेत्री तिच्या हॉट अवताराने पार्टीमध्ये आकर्षण वाढवताना दिसली.
अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या आईसोबत या पार्टीमध्ये पोहचली. उर्वशीने सिल्वर कलरचा ट्रान्सपरेंट गाऊन परिधान केला होता.
अभिनेत्री हिना खानने डार्क पर्पल कलरचा गाऊन परिधान करत या पार्टीमध्ये हजेरी लावली.