Priya More
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याला नवं प्रेम मिळालं.
५६ वर्षांचा अरबाज खान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे.
अरबाज खान यावेळी कोणत्याही अभिनेत्रीच्या प्रेमात पडला नाही. तर तो एका मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला आहे.
अरबाज खान सध्या जिच्या प्रेमात पडला आहे त्या मेकअप आर्टिस्टचे नाव शौरा खान आहे.
अरबाज आणि शौरा एकमेकांच्या प्रेमात खूपच सिरिअस असून ते लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
अरबाज आणि शौराचं लग्न हे इंटीमेट वेडिंग असेल. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहतील.
अरबाज आणि शौराची भेट त्याचा आगामी चित्रपट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली असल्याचे सांगितले जात आहे.
शौरा खान ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. ती अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशासाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते.
अरबाज खानने १९९८ मध्ये अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते. १९ वर्षानंतर हे दोघं वेगळे झाले.
मलायकासोबत वेगळं झाल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. २०१९ मध्ये त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.