Manasvi Choudhary
आजकाल वजन कमी करणे ही मोठी समस्या बनली आहे. केवळ जिम आणि डाएट करून वजन कमी होत नाही. तर यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये देखील बदल केला पाहिजे.
वाढलेल्या वजनामुळे पोटाच्या चरबीमुळे तुम्हीही त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत गुणकारी आणि सोपा घरगुती उपाय आहे.
सकाळी रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्यात पुदिना, लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
हळदीमध्ये 'करक्यूमिन' नावाचा घटक असतो, जो शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करतो आणि चरबी जाळण्यास मदत करतो.
लिंबू आणि पुदिन्याचे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते.
कोमट पाण्यात हळद, लिंबू आणि मधाचे सेवन केल्याने शरीरातील वाढलेली चरबी हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते.
सकाळी हे ड्रिंक प्यायल्याने संपूर्ण दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि मन प्रसन्न होते.
१) एका भांड्यात एक ग्लास पाणी हलके कोमट करा.
२) त्यात चिमूटभर किंवा अर्धा चमचा हळद पावडर टाका.
३) त्यात ताज्या पुदिन्याची काही पाने आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळा.
४) शेवटी चवीनुसार आणि आरोग्यासाठी थोडेसे मध मिसळून हे मिश्रण चांगले ढवळून घ्या.
५) हे ड्रिंक दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
NEXT: फुफ्फुसे स्वच्छ करतील हे 5 ड्रिंक्स, रोज सकाळी न चुकत्या प्यायल्यास होईल फायदा