Manasvi Choudhary
फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी केवळ आहार महत्वाचा नाही तर तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्स देखील पिणे महत्वाचे आहे.
वाढते प्रदूषण, धूळ यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो आहे. फुफ्फुसांमध्ये विषारी घटक साचल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो तसेच सर्दी - खोकला या समस्या उद्भवतात.
फुफ्फुसांच्या नैसर्गिक स्वच्छतेसाठी तुम्ही घरच्या घरी हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करू शकता ते ड्रिंक्स कोणते आहेत या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आलं आणि लिंबू या दोन्ही मध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.जे फुफ्फुसांना नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात.
पालक, थोडी कोथिंबीर, सफरचंद आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा. ही पौष्टिक ग्रीन स्मूदी सकाळी किंवा दुपारच्या वेळी प्या.
गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असते, तर बीटामध्ये नायट्रेट्स असतात जे रक्तवाहिन्या मोकळ्या करतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात. यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास फायदा होतो.
काकडी शरीर हायड्रेट ठेवते यामुळे काकडी पुदीना ड्रिंक प्यायल्याने फुफ्फुसांना थंडावा मिळून श्वास घेण्याची प्रक्रिया अधिक सुधारते.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे फुफ्फुसांना ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून वाचवतात. हे फुफ्फुसांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास आणि श्वसनाचे विकार दूर करण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.