Shreya Maskar
हळद ही भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते.हळदीमध्ये कर्क्युमिन (Curcumin) नावाचे सक्रिय घटक असते. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म आढळतात.
हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनमध्ये दाहशामक गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीरातील दाह कमी करण्यास मदत होऊ शकते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात.
काही लोकांना हळदीचा चहा प्यायल्याने पचनासाठी आरामदायी वाटू शकते. मात्र अॅसिडिटी, गॅस किंवा अपचनावर हळदीचा चहा प्रभावी उपचार आहे.
हळदीतील अँटिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्मांमुळे हृदयाच्या आरोग्य सुरक्षित ठेवतात. हळदीचा चहा सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे.
आले आणि हळद घालून तयार केलेला गरम चहा प्यायल्याने घशाला आराम मिळू शकतो. गरम पेयामुळे घशातील कोरडेपणा आणि अस्वस्थता कमी जाणवू शकते.
साखर न घालता तयार केलेला हळदीचा चहा गोड पेयांच्या तुलनेत कमी कॅलरीचा असतो. त्यामुळे गोड चहा किंवा साखरयुक्त पेये तुम्हाला कमी करायचे असेल तर हा चहा नक्की प्या.
हळदीचा चहा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पिणे महत्त्वाचे आहे. दिवसातून एक छोटा कप किंवा अर्धा कप हळदीचा चहा प्या. चहा बनवताना साधारण ¼ ते ½ टीस्पून हळद वापरावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.