Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाज्याला विशेेष महत्व दिले आहे. वास्तुशास्त्रात घराच्या दाराविषायी काही नियम सांगितले आहेत.
धार्मिक संस्कृतीनुसार, घराच्या उंबरठ्याला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे. रोज सकाळी मुख्य दाराची पूजा केली जाते.
घराच्या उंबरठ्यावर हळद आणि कुंकू वाहण्याची किंवा हळद लावण्याची परंपरा जुनी आहे. यापरंपरेमागे अनेक धार्मिक कारणे आहेत.
उंबरठा हा घरातील आणि बाहेरील सीमा रेषा मानला जातो. बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दृष्टिक्षेप घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी घराला हळद लावली जाते.
हळद ही अत्यंत शुभ मानली जाते. ती समृद्धीचे प्रतीक आहे. उंबरठ्यावर हळद लावल्याने घरात माता लक्ष्मीचा वास राहतो
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाशी संबंधित काही लहान-मोठे दोष असतील, तर नियमित उंबरठ्यावर हळद लावल्याने कमी होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.