Manasvi Choudhary
चेहऱ्यावरच्या बारीक - बारीक केसांसाठी महिला व मुली पार्लरमध्ये जाऊन उपाय करतात. लेझर, व्हॅक्सिंग यासारख्या ट्रिटमेंट घेतात.
मात्र यामुळे त्वचेवर समस्या उद्भवतात घरगुती सोप्या उपायाने तुम्ही चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढू शकणार आहात.
चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी हळद आणि दुधाचा फेस पॅक लावा.
चेहऱ्याला हळद आणि दुधाचा नैसर्गिक फेसपॅक लावल्याने त्वचेवरील बारीक केस कमी होतात चेहरा स्वच्छ होतो.
दूधामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने असतात यामुळे कच्चे दूध चेहऱ्याला लावल्याने नैसर्गिक चमक येते.
एका भांड्यामध्ये हळद आणि कच्चे दूध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट जास्त पातळ करू नका .
चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या त्यानंतर ज्या ठिकाणी केस आहेत त्या ठिकाणी हा फेसपॅक लावा. फेसपॅक सुकून द्या. सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा.