Manasvi Choudhary
आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषण धूळ यामुळे केस खराब होण्याची समस्या वाढली आहे.
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता.
स्वयंपाकघरातील लसूण, कांदा आणि खोबरेल तेलाचा वापर तुम्ही केसांसाठी करा यामुळे केसांची मुळापासून वाढ होईल.
घरगुती तेल बनवण्यासाठी ४-५ लसणाच्या पाकळ्या, बारीक किसलेला कांदा आणि खोबरेल तेल आवश्यक आहे.
एका स्वच्छ भांड्यात लसणाच्या पाकळ्या आणि बारीक किसलेला कांदा मिक्स करा. नंतर यात खोबरेल तेल मिक्स.
हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एका बाटलीमध्ये भरा आणि ४ ते ५ दिवस ठेवा.
केस धुण्याच्या अर्धातास आधी तुम्ही हे घरगुती तेल केसांना लावा आणि मालिश करा यामुळे केसांची वाढ होईल.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा घरगुती तेलाने केसांची मालिश केल्याने केस वाढतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.