ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तूप आणि गूळ दोघेही पचनासाठी लाभदायक आहेत. गूळ पचनसंस्थेतील अॅसिडिटी कमी करतो, तर तूप आतड्यांना लुब्रिकेट करून अन्न सहज पचण्यास मदत करते.
गूळ शरीरातील उष्णता संतुलित ठेवतो, तर तूप थंडावा देणारे असल्याने दोघे मिळून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात.
गूळ नैसर्गिक साखर असल्यामुळे लगेच उर्जा देतो. तूप हा चांगला चरबीचा स्रोत असल्यामुळे तो शरीराला दीर्घकालीन ऊर्जा पुरवतो.
तुपातील फायटी न्युट्रिएंट्स आणि गूळातील अँटीऑक्सिडंट्स यामुळे त्वचा उजळ होते आणि केस मजबूत होतात.
तूप हाडांसाठी उपयुक्त आहे, आणि गुळातील लोह, कॅल्शियमसारखे घटक हाडांना बळकट करतात.
गूळ शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतो आणि यकृत (लिव्हर) साफ ठेवतो. तूप आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवतो.
तूप मेंदूसाठी पोषक असून, गूळ मूड सुधारण्यात मदत करतो. दोघांची एकत्रित आहारात भर केल्यास तणाव कमी होतो आणि मनःशांती मिळते.