Narali Bhat Recipe: या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा झटपट टेस्टी नारळी भात रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्याची तयारी


नारळी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य – बासमती तांदूळ (१ कप), किसलेलं ओलं खोबरं (१ कप), साखर (१ कप), तूप (२ टेबलस्पून), वेलदोडा पूड, थोडे काजू व बदाम, केशर दूध.

Narali Bhat Recipe

तांदळाचं स्वच्छ धुणं व भिजवणं


बासमती तांदूळ २०-३० मिनिटे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजवून ठेवा. नंतर निथळून घ्या.

Narali Bhat Recipe

तांदूळ शिजवणे


एका पातेल्यात पाणी उकळून त्यात तांदूळ घालून ८०% पर्यंत शिजवून घ्या आणि लगेच गाळून ठेवा.

Narali Bhat Recipe

खोबरं व साखर एकत्र करून शिजवणं


दुसऱ्या भांड्यात तूप गरम करून त्यात किसलेलं ओलं खोबरं व साखर घालून मध्यम आचेवर थोडं शिजवून घ्या.

Narali Bhat Recipe

सुगंधी घटकांची भर


वेलदोड्याची पूड, केशर दूध व शिजवलेले तांदूळ खोबऱ्याच्या मिश्रणात हलक्या हाताने एकत्र करा.

Narali Bhat Recipe

साजूक तुपात सुके मेवे परतणं


एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू-बदाम हलकेसे परतून भातात घालावे.

Narali Bhat Recipe

झाकण ठेवून वाफ देणे


गॅस मंद आचेवर ठेऊन ५-७ मिनिटे झाकण ठेवून वाफ द्या. नारळी भात तयार झाला की त्यावर थोडंसं तूप घालून गरम गरम सर्व्ह करा.

Narali Bhat Recipe

Narali Purnima: नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? 99% लोकांना माहिती नसेल

Narali Purnima
येथे क्लिक करा