Shreya Maskar
पावसाळ्यात पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे वळतात.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले तुंगार्ली तलाव पर्यटनाचे आकर्षण आहे.
धकाधकीच्या जीवनातून क्षणभर निवांत वेळ घालवण्यासाठी लोणावळ्यातील हे बेस्ट ठिकाण आहे.
तुंगार्ली धरण तुंगार्ली तलावातील पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे.
तुंगार्ली तलावाजवळील डोंगराळ परिसर पर्यटकांचे मन भारावून टाकतो.
तुम्ही या ठिकाणी कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत वीकेंड प्लान करू शकता.
तुंगार्ली तलाव परिसरातून लोहगड किल्ला नजरेस पडतो.
तुंगार्ली तलावाच्या जवळ अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स उपलब्ध आहेत.
पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
लोणावळ्याला आलेला पर्यटक तुंगार्ली तलावाला भेट दिल्याशिवाय घरी जात नाही. असे पर्यटकांना भुरळ पाडणारे तुंगार्ली तलावाचे सौंदर्य आहे.