Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक आकर्षण, पवना तलावाने वेढलाय 'हा' किल्ला

Shreya Maskar

लोणावळ्याजवळील किल्ला

तुंग किल्ला ज्याला 'कठिनगड' म्हणूनही ओळखले जाते. हा लोणावळ्याजवळ असलेला एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. तुंग किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ प्रदेशात वसलेला आहे.

Lonavala | google

तुंग किल्ला

तुंग किल्ला पुण्यातील पवना धरणाच्या (पवना तलाव) परिसरात वसलेला एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. पवना धरणाच्या विस्तीर्ण जलायशामुळे हा किल्ला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. पुणे-मुंबईपासून हे ठिकाण जवळ आहे.

Tung Fort | google

पवना तलाव

तुंग किल्ला थरारक ट्रेकिंगसाठी ओळखला जातो. तुंग किल्ला हा सह्याद्रीच्या रांगेतील एक 'निरीक्षण बुरूज' म्हणून ओळखला जायचा. वीकेंडला येथे नक्की फिरायला जा.

Pavana Lake | google

कोणी बांधला?

तुंग किल्ला इ.स. १६०० च्या सुमारास आदिलशाही घराण्याने बांधला होता. नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला.

Who Built It? | google

ट्रेकिंगचा थरार

तुंग किल्ला थरारक ट्रेकिंग स्पॉट आहे. तुंग किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १,०७५ मीटर (३,५२६ फूट) उंच आहे. येथे मार्गावर खडकाळ टप्पे आणि खोल दऱ्यांचे कडे पाहायला मिळतात.

Trekking | google

तीन किल्ले

तुंग किल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यावर आजूबाजूच्या विस्तीर्ण परिसराचे विहंगम दृश्य दिसते. मुख्य म्हणजे येथून पूर्वेकडे तिकोना, उत्तरेकडे लोहगड आणि विसापूर हे किल्ले आणि सभोवताली पसरलेला पवना धरणाचा अथांग जलाशय स्पष्ट नजरेस पडतात.

Three Forts | google

ऐतिहासिक महत्त्व

तुंग किल्ला हा प्रामुख्याने घाटरक्षक दुर्ग आणि टेहळणी बुरुज म्हणून बांधण्यात आला होता. बोरघाटामार्गे होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवणे आणि लोहगड व विसापूर या मुख्य किल्ल्यांवर शत्रूच्या आक्रमणाची पूर्वकल्पना देऊन रसद पुरवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

Historical Significance | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : उंच कडे अन् कातळ पायऱ्या; पनवेलजवळ वसलाय 'हा' भव्य किल्ला, प्रत्येक पावलावर अनुभवाल थरार

Fort In Panvel | saam tv
येथे क्लिक करा...