Alisha Khedekar
तुळशीला हिंदू संस्कृतीत पवित्र स्थान आहे. मात्र घरात तुळशी वृंदावन ठेवताना योग्य जागेची निवड करणे महत्त्वाचे मानले जाते.
तुळशी वृंदावन मुख्य दरवाजाच्या अगदी समोर ठेवण्याऐवजी थोडे बाजूला ठेवावे, अशी वास्तुशास्त्रीय मान्यता आहे.
तुळशीला सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा आवश्यक असते. त्यामुळे अंधाऱ्या, बंद जागेत वृंदावन ठेवणे टाळावे.
तुळशीला पवित्र मानले जाते. त्यामुळे बाथरूम किंवा शौचालयाच्या अगदी जवळ वृंदावन ठेवणे अनेक घरांमध्ये टाळले जाते.
कचरा, सांडपाणी किंवा अस्वच्छ परिसरापासून तुळशी वृंदावन दूर ठेवावे. स्वच्छ आणि प्रसन्न जागा निवडणे योग्य मानले जाते.
पायऱ्यांखाली अंधार आणि कमी जागा असते. त्यामुळे अशा ठिकाणी तुळशी वृंदावन ठेवण्याऐवजी मोकळी जागा निवडावी.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा