ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. पूजेपासून अनेक शुभ कार्यात तुळशीचा वापर केला जातो.
असं मानलं जातं की, माता लक्ष्मी देवीचा वास तुळशीत असतो यामुळे नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी म्हणजेच २ नोव्हेंबरला तुळशीविवाह आहे.
२ नोव्हेंबर सकाळी ७.३१ ते ३ नोव्हेंबर सकाळी ५.०७ वाजेपर्यंत तुळशीविवाहचा शुभ मुहूर्त असेल. तुळशीविवाहच्या दिवशी तुळशीची पूजा केली जाते.
तुळशी विवाहनिमित्त तुम्ही घराच्या अंगणात सुंदर अश्या रांगोळी डिझाइन्स काढा यामुळे घराची शोभा वाढेल
तुळशीची पूजा ज्या ठिकाणी करणार आहेत तेथे तुम्ही देवीची प्रतिकृती काढू शकता.
तुळशी विवाहच्या दिवशी तुम्ही घरासमोर रांगोळी काढा आणि त्यावर तुळशीविवाह असे लिहा.
तुळशीविवाह निमित्त तुळशीचे वृंदावन आणि उसाचे रोप असे काढा.