Tulsi Vivah Puja: तुळशी विवाहची पूजा कशी करायची? वाचा संपूर्ण विधी

Manasvi Choudhary

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. पूजेपासून अनेक शुभ कार्यात तुळशीचा वापर केला जातो.

Tulsi Vivah 2025 | Social Media

आयुर्वेदिक

आयुर्वेदिक तुळशीच्या पानांचा आरोग्यासाठी उपयोग केला जातो.

Tulsi Vivah | Social Media

देवी लक्ष्मी

असं मानलं जातं की, माता लक्ष्मी देवीचा वास तुळशीत असतो यामुळे नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते.

Tulsi Vivah | Social Media

कधी आहे तुळशीविवाह

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी म्हणजेच २ नोव्हेंबरला तुळशीविवाह आहे.

Tulsi Vivah |

तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य

नारळ, विड्याची पाने, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, खोबऱ्याच्या वाट्या, हळद- कुंकू, पंचा, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, निरनिराळी फळे, लाह्या, पुजेसाठी कलश, कापूर, अक्षता, निरंजन हे साहित्य तयार ठेवा.

Tulsi Vivah | Google

कुंकूवाचा टिळा लावा

पुजेच्या सुरूवातील आई- वडिल, गुरू, देव घरातील मंडळीना नमस्कार करावा नंतर स्वत:च्या कपाळा कुकूंवाचा टिळा लावा आणि पुजेला बसा.

Tulsi Vivah | Social Media

मंत्राचा जप करा

श्रीमन् महागणपतये नम: असा मंत्र म्हणून पुजेला सुरूवात करा. तुलसीसहित श्रीगोपालकृष्ण प्रीत्यर्थ विवाहोत्सांगध्यानावहनदि पोषशोपचार पूजनं करिष्ये असे म्हणून कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी.

Tulsi Vivah | Social Media

आचमन करा

सर्वप्रथम आचमन करावे आणि हातात पळीने तीन वेळेस पाणी प्यावे.

Tulsi Vivah | Social Media

next: Mumbai Powai Travel Spot: पवईतील प्रसिद्ध 4 ठिकाणे, येथे गेल्यास मन हरवून जाईल

येथे क्लिक करा...