Shreya Maskar
तुळशीचा चहा बनवण्यासाठी तुळशीची पाने, पाणी, मध , लिंबू इत्यादी साहित्य लागते.
तुळशीचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पाणी उकळवून घ्या.
उकळत्या पाण्यात तुळशीची पाने टाकून छान गरम करा.
चहा उकळल्यावर तो गाळून घ्या.
त्यानंतर चहामध्ये लिंबू पिळून घ्या.
लिंबू पिळून झाल्यावर त्यात अर्धा चमचा मध टाका.
सकाळी उठल्यावर एक कप तुळशीचा चहा प्यायल्याने दिवसभर उर्जा राहते.
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यावर तुळशीचा चहा रामबाण उपाय आहे.