Shreya Maskar
पनीर चिला बनवण्यासाठी पनीर, बेसन, हिरवी मिरची, चाट मसाला, कोथिंबीर, तेल, मीठ आणि ओवा इत्यादी साहित्य लागते.
पनीर चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये बेसन घ्या.
बेसनमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा आणि चाट मसाला घालून छान मिक्स करा.
त्यानंतर यात थोड पाणी घालून बेसन पीठ घाला.
मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
यात किसलेले पनीर घालून एकजीव करा.
पॅनमध्ये तेल गरम करून पनीरचे मिश्रण गोलाकार पसरवून गोल्डन फ्राय करून घ्या.
पनीर चिला मस्त शिजल्यावर पुदिन्याच्या चटणीसोबत खा.