Manasvi Choudhary
तुळशीचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. तुळशीचा चहा प्यायल्याने शरीरात होणार सकारात्मक बदल ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
तुळशीमध्येव्हिटॅमिन सी आणि झिंक असते, जे नैसर्गिक अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मासाठी ओळखले जातात. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा पिणे फायदेशीर ठरते.
तुळशीचा चहा प्यायल्याने शरीरातील कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स अॅक्टिव्ह होते त्यामुळे ताणतणाव कमी होतो.
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा चहा घेतल्याने पोटाची पचनसंस्था सुधारते, अपचन, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.
तुळशीचा चहा प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी तुळशीच्या चहाचे सेवन करावे.
तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.