Manasvi Choudhary
सणासुदीनिमित्त तुम्हीही सिल्क साड्या घेण्याचा विचार करत असाल तर खालील लेटेस्ट पॅटर्न्स नक्की ट्राय करा.
पैठणी साडी म्हणजे प्रत्येक महिलांसाठी प्रसिद्ध आहे. मोर, पोपट आणि पदरावर कुडकवलेले सोन्या-रुप्याचे जरीकाम या डिझाईन्समध्ये पैठणी बाजारात उपलब्ध आहे.
कांजीवरम साडी बॉर्डर आणि रेशमी धाग्यांसाठी प्रसिद्ध आहे.
बनारसी साडी रेशीम, जटाई काम आणि सोनेरी-रुपरी ब्रोकेड डिझाईनसाठी प्रसिद्ध आहेत.
म्हैसूर सिल्क साडीचे कापड मऊ असते. ही साडी सोन्याच्या जरी कामासाठी ओळखली जाते.
तसर सिल्क साडी ही अत्यंत कम्फर्टेबल असते. ही साडी नेसल्यानंतर रिच लूक वाटतो.
चंदेरी सिल्क साडी ही रेशम आणि सुती धाग्यांपासून बनवली जाते. ही साडी अत्यंत हलकी असल्याने सहज नेसता येते आणि नेसल्यानंतर कम्फर्टेबल वाटते.
पटोला साडीच्या दोन्ही बाजूंना एकसारखीच डिझाईन आणि रंग छटा असते त्यामुळे ही साडी नेसल्यानंतर लूक सुंदर दिसतो.
कोसा सिल्क या साडीचा कापड कडक असतो मात्र ही साडी टिकाऊ असते. तुम्ही बराच काळ हि साडी सहज नेसू शकता. सणसमारंभात हटके लुकसाठी कोसा सिल्क बेस्ट ऑप्शन आहे.