ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तुळशीला फार महत्व आहे.
हिंदू धर्मात तुळशीची मनोभावे पुजा देखील केली जाते.
वास्तुशास्त्रात तुळस कुठे ठेवावी आणि कुठे ठेवू नये याची माहिती देण्यात आली आहे.
तुळशीचे रोप काही व्यक्ती थेट जमीनीवर लावतात. मात्र तसे न करात तुळस एका भांड्यात लावावी.
काही व्यक्ती तुळशीला जास्त सूर्यप्रकाश मिळावा या विचाराने ती घराच्या छतावर लावतात. मात्र तसे करणे चूक आहे.
तुळस कधीच जिथे अंधुक प्रकाश आहे अशा ठिकाणी लावू नये.
महादेवाच्या प्रतिमेसमोर कधीच तुळशीचे झाड लावू नका.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.