Satish Daud
तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. इतकंच नाही तर त्याची नियमित पूजा देखील केली जाते.
तुळशीत देवी लक्ष्मीचा वास असतो, असं हिंदू धर्मात मानलं जातं. त्यामुळे अनेकजण तुळशीचे रोप लावतात.
तुळस लावण्याचे अनेक वैज्ञानिक फायदे देखील आहे. तुळशीचे पानेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तुळशीच्या बियांना मंजिरी असं संबोधलं जातं. घरात कुठलीही पूजा असतात मंजिरी वापरली जातात.
पण तुळशीची मंजिरी कोणत्या दिवशी तोडावीत, याबाबत अनेकांना माहिती नाहीये. आज आपण याबद्दल जाणून घेऊयात.
तुळशीच्या मंजिरीचा रंग तपकिरी झाला की ते तोडावे असं अनेकजण सांगतात.
रविवारी किंवा सोमवारी तुळशीची मंजिरी अजिबात तोडू नये, ते अशुभ मानलं जातं.
तुळशीचे मंजिरी तोडल्यानंतर ती लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून ठेवावी आणि त्यानंतरच पूजेसाठी वापरावी, असं सांगण्यात येतं.
टीप : ही महिती फक्त श्रद्धा, धार्मिक ग्रंथ यावर आधारीत आहेत. कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.