Shreya Maskar
तुळशीच्या पानांचा काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने, आले, दालचिनी,काळी मिरी, पाणी, मध आणि गूळ इत्यादी साहित्य लागते.
तुळशीच्या पानांचा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात तुळशीची पाने, किसलेले आले, दालचिनी आणि काळी मिरी टाकून मिक्स करा.
तुळशीच्या पानांचा काढा 8-10 मिनिटे छान उकळू द्या.
त्यानंतर यात अर्धा चमचा मध आणि थोडासा गूळ टाका.
आता सर्व मिश्रण गाळून एका ग्लासमध्ये ओता.
पावसाळ्यात एक छोटा ग्लास तुळशीच्या पानांचा काढा प्यायल्याने सर्दी-खोकला आणि घसा खवखवणे हे त्रास दूर होतील.
तुम्ही तुळशीच्या पानांचा काढ्यामध्ये लवंग आणि वेलची देखील घालू शकता.