ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुळजाभवानी देवीवर भाविकांची नितांत श्रद्धा आहे.
रोज हजारो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक स्वतः तुळजाभवानी मातेसाठी अनेक गोष्टी अर्पण करतात.
ठाण्यातील एका भाविकाने तुळभवानी मातच्या चरणी सोन्याचा मुकुट अपर्ण केला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी एका भाविकाने ५४० ग्रॅम (अर्धा किलो) चा सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. या मुकुटाची किंमत जवळपास ५ कोटी रुपये असेल.
तुळजाभवानी मातेवर आमच्या कुटुंबियांची नितांत श्रध्दा असुन समर्पनाच्या भावतेतून देवीचरणी सुवर्णालंकार अर्पण केल्याचे भाविकांनी सांगितले आहे.
यावेळी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने या भाविक कुटुंबियांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.
जेव्हा सोन्याचा मुकुट अपर्ण केला तेव्हा मंदिर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.
Next: छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या मुलांची नावे काय?