Priya More
'तुला पाहते रे फेम' सोनल पवारचा आज मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.
‘रमा राघव’ आणि 'तुला पाहते रे फेम' सोनल पवारने आज समीर पालुष्टेसोबत लग्न केले.
सोनलच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठमोळ्या पद्धतीने सोनल आणि समीर यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नामध्ये समीर आणि सोनल खूपच क्युट दिसत होते.
सोनलने राणी कलरची नऊवारी साडी नेसली होती. मराठमोळा साज केलेली सोनाली लग्नात खूपच सुंदर दिसत होती.
सोनलचा पती समीरने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. डोक्यावर फेटा बांधलेला समीर लग्नात खूपच हँडसम दिसत होता.
फोटोंवर कमेंट्स करत सोनलच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत या कपलला आशीर्वाद दिले आहेत.
सुबोध भावे आणि गायत्री दातारच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून सोनल पवारला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरामध्ये पोहचली.
सोनल सध्या ती 'रमा - राघव' या मालिकेत काम करत आहे. यासोबतच तिने ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेतही काम केले आहे.