Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
गायत्री दातार सध्या कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
गायत्री दातारने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाची साडीतील फोटो शेअर केले आहेत.
गायत्रीने पिवळ्या रंगाच्या साडीवर जांभळ्या रंगाचा कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज घातला आहे.
गायत्रीने कॉन्ट्रॅस्ट रंगाची ज्वेलरी घातली आहे. हिरव्या रंगाचा डायमंडचा हार आणि इअररिंग्स गायत्रीने घातले आहे.
गायत्री या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.पिवळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुललं आहे.
गायत्रीला खरी ओळख 'तुला पाहते रे' या मालिकेतून मिळाली.