Sakshi Sunil Jadhav
विद्यार्थ्यांना दिवस चांगल्या संधी घेऊन आलेल्या आहे. भाग्याची दारे सहज उघडतील. तीर्थक्षेत्रि भेटी होतील.
सरकारी कामांमध्ये व्यत्यय येण्याचा संभव आहे. महत्त्वाची कामे दुपारनंतर केलेली बरी पडतील.
केलेल्या कष्टाची आज जोरकस फळे मिळणार आहेत. भागीदारी व्यवसायामध्ये फायदाच फायदा होईल.
मानासिकता सांभाळून पुढे जावे लागेल. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. नोकरीच्या ठिकाणी बदलीचा योग संभावतो आहे.
नव्या कल्पनाने दिवस भारलेला असेल. आपली प्रतिभा वाढेल. प्रेमामध्ये काही वचने द्याल. धनयोग सुद्धा उत्तम आहेत.
जेवढे झोपेल तेवढेच कामे आज करणे गरजेचे आहे. घरातील लोकांच्या सहकार्याने पुढे जाल.
बहिणीची माया आणि प्रेम लाभेल. एखादी गोष्टीची जबाबदारी घेऊन झपाटलेल्या प्रमाणे कामे कराल.
अनेक गोष्टी एकट्याला आज कराव्या लागतील. कुटुंबीयांशी सल्ला मसलात करून पैशाची निगडित व्यवहार आज कराल.
अपेक्षित अशा घटना आज दिवसभरात घडणार आहेत. आनंदामध्ये भर पडेल. लोकांच्यात ऊठबस होईल. दिवस आनंदी आहे.
नको असलेल्या गोष्टी वेळीच बाजूला सारलेल्या बरे असतात. मग ते नाते असो मानसिकता असो.
मैत्रीच्या गाठी घट्ट होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा अपेक्षिताचा प्रतिसाद मिळाल्यामुळे दिवस आनंदी आहे.
जे ठरवाल ते करालच असा दिवस आहे. प्रवास घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अव्वल बाजी मारण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.