Anjali Potdar
सणाच्या आरंभाची सुरुवात कायमच धावपळीची असते. आपल्या ताकतीपेक्षा अधिक गोष्टी
शिव उपासना, शक्ती उपासना आज तुम्हाला फलदायी ठरणार आहेत. तीर्थक्षेत्रि भेटी होतील.
नवनवीन आव्हाने घेऊन कामाला लागाल. सासुरवाडी कडून विशेष फायदा संभवतो आहे. दिवस चांगला आहे.
आयुष्य हे स्वतःसाठी जगायचं असते. आनंदासाठी जगायचं असते हे आपल्या राशीला चांगलेच माहिती आहे.
कुठेतरी उगाच मोठेपणा दाखवायला जायचे किंवा कधी कधी अतिउदार स्वभाव दोन्ही मुळे आज तुम्ही गोत्यात येण्याचा संभव आहे.
हरतालिकेचा दिवस आहे. एक नव्याने उत्साह आज दिवसभरात तुमच्या राशीला राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील.
धनलाभ चांगले आहेत. पैशाचा हिशोब किंवा वैश्य प्रवृत्तीची आपली असणारी रास अजून धडपडीने दोन कमावण्याच्या मागे आज लागणार आहात.
भावंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. एखादी गोष्ट नव्याने करण्याचा मानस आपल्याकडून राहील.
गृह सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. सणाच्या निमित्ताने घरी सर्वजण एकत्रित येणे छोटासा उत्सव साजरा करणे अशा गोष्टी घडतील.
शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लांब आणि मोठ्या मुदतीच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही सरसावाल. सृजनशीलता वाढेल.
तब्येतीच्या जरा तक्रारी राहतील. दुर्लक्ष करून चालणार नाही. कामामध्ये मात्र अडचणी आल्या तरी सर्वांवर मात करून जाल.
जोडीदाराच्या भावना समजून घेऊन आज वागावे लागेल. प्रेमातून लाभ होतील.