Sakshi Sunil Jadhav
आपण करत असलेल्या गोष्टींमध्ये अडकाठी येण्याचा आजचा दिवस आहे. शत्रुत्व वाढेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.
कलात्मकता जोपासून पुढे जाणार आहात. प्रेमामध्ये विशेष यश मिळेल. देवी उपासना विशेष फलदायी ठरेल. धनयोग चांगले आहेत.
शेतीवाडी मध्ये भरभराट होणार आहे. सर्व सुखे सहज दारी येतील दिवस चांगला आहे.
बहिणीचे विशेष प्रेम आणि माया मिळेल. रेंगाळलेले पत्र व्यवहार आज मार्गी लागतील. प्रवास सुखाचे होतील.
एक वेगळी ताकद आपल्याला आज मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीचे महत्त्व असे निर्णय आज पार पडणार आहेत.
"तळ्यात का मळ्यात" अशी ही अवस्था होईल. बुद्धी आणि मन यापैकी आज मनाचा कौल विचारात घ्या. आरोग्य उत्तम राहणार आहे.
पैशाची कमी तशी आपल्या राशीला नसते. पण आज मात्र आलेल्या पैशाला वाटाही अनेक निर्माण होतील.
चांगल्या गोष्टी मध्ये वृद्धी होईल. शेजारी, नातेवाईक यांच्या सहकार्याने आज पुढे जाल. दिवस चांगला आहे .
सामाजिक क्षेत्रामध्ये आघाडीवर राहणार आहात. समाधान आणि आनंद या दोन्ही गोष्टी समान वाटणी झाल्याप्रमाणे आजचा दिवस आपल्यासाठी आहे.
मोठे प्रवास घडणार आहेत. भाग्यकारक घटना घडतील. नातवंड सौख्य उत्तम आहे. शिव उपासना फायद्याची ठरेल.
जाणता आजाणता अर्थातच नकळत काही चुका आपल्याकडून होतील. ज्या त्रासदायक ठरतील.
व्यापारामध्ये वृद्धी होईल. आपल्या साध्या स्वभावाचा मात्र समोरचा पक्ष फायदा घेत नाही ना हे समजून पुढे जा.