Sakshi Sunil Jadhav
WhatsAppमध्ये अनेक सुविधा मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये इंस्टंट मेसेजचे फिचरसुद्धा आले आहे.
WhatsAppमध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी असतात. तसेच इतरांशी संपर्क करण्यासाठी लोक WhatsApp मेसेजचा जास्त वापर करतात.
तुम्हाला जर काही मेसेज लपवायचे असतील किंवा टाळायचे असतील तर तुम्ही पुढील स्टेप्सचा वापर करु शकता.
सगळ्यात आधी तुम्हाला हवे असलेल्या व्यक्तीचे चॅट निवडा. मग त्यावर लॉंग प्रेस करुन ठेवा.
लॉंग प्रेस केल्यानंतर कोपऱ्यातल्या तीन डॉट्सवर क्लिक करुन Lock Chatवर क्लिक करा.
त्यानंतर Continue बटनावर क्लिक करुन चॅट लॉक करा. तुम्हाला आता हे चॅट WhatsAppच्या होम पेजवर दिसतील.
तुम्ही हे चॅट locked chats फोल्डरमध्ये जाऊन पाहू शकता.
आता locked chats प्रेस करुन तुम्ही मोबाईलचा पासवर्ड टाकून चॅट्स पाहू शकता. अन्यथा ते तुम्हाला दिसणार नाहीत.