Sakshi Sunil Jadhav
नोकरी व्यवसायामध्ये काहीतरी चांगल्या घटना, घडामोडी घडणारा आजचा दिवस आहे. लक्ष्मीपूजन सार्थकी लागेल. पण त्याचबरोबर हितशत्रूंचा त्रासही संभवत आहे.
कला क्षेत्रामध्ये नशीब आजमावयाला दिवस छान आहे. दिवस धावपळीचा आणि व्यस्त राहील. शेअर्स, लॉटरी, रेस यामधून धन योगाचा संभव आहे.
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. मनाने ठरवलेल्या गोष्टी आज तशाच होण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.
पराक्रम सार्थकी लागेल. लक्ष्मीची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे आणि जिद्द चिकाटी आणि उमेद यामुळे पुढे जाल. भावंडा सौख्य भरपूर मिळेल.
देवी लक्ष्मीची कृपा आज विशेष बरसणार आहे. धनाच्या नवनवीन संधी आज उपलब्ध होतील. मोठे व्यवहार पार पडतील.
मनमोर येऊन आज बहरणार आहे. सुखाचा, आनंदाचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आपली मुळातच बुद्धिजीवी असणारी रास पण आज स्वमग्न रहाल.
धनाचा व्यय आज दिसतो आहे. पण त्यामधून नवनवीन गोष्टी आज घ्याल असेही वाटते आहे. खरेदीतून आनंद मिळेल. लक्ष्मीपूजन सार्थकी लागल्याचे भावना दिवसाच्या शेवटी होईल.
काहीतरी सातत्याने नाविन्याचा शोध आपल्या राशीला आवडतो. व्यवहार जपून करा.आज कामे कराल पण गुढत्वाकडे ओढा राहील .
दिवाळीचा बोनस अर्थाशी निगडित आणि कार्याशी निगडित आज आपल्याला मिळेल. केलेल्या गोष्टींचे पूर्ण श्रेय कामाच्या ठिकाणी मिळाल्यामुळे मनस्वास्थ चांगले असेल.
"जो जे वांछील तो ते लाहो" असा दिवस आहे. यशाची द्वारे सहज उघडणार आहेत. देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर विशेष बरसणार आहे. भाग्याला नवीन कलाटणी मिळेल.
मोठ्या धन योगाचे लाभ दिसत आहेत. गुप्तधन, काळा पैसा, जोडीदाराकडून विशेष धनयोग आज दिसून येत आहेत. केलेल्या कर्माचे विशेष लाभ दिसून येतील.
व्यवसायामध्ये "घे भरारी" असा दिवस आहे. व्यस्तता वाढेल. नवनवीन बैठका आणि आयुष्यात नवीन संधीची उपलब्धता असा दिवस आहे. लक्ष्मी कृपा विशेष राहील.