Tuesday Horoscope : आज सावध रहा… विश्वासूच देऊ शकतात धोका; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज नव्याने ओळखी होतील. जे ठरवाल ते कराल. वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेष | Saam tv

वृषभ

स्वतःसाठी आणि इतरांसाठी हात सैल सोडून पैसे खर्च कराल. खर्चाला धरबंद राहणार नाही. मोठे काही निर्णय मार्गी लागतील.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

सोबतीचा करार असल्याप्रमाणे आजचा दिवस आहे. तुमचीच तुम्हाला सोबत आणि संगत आज भावेल. आरोग्य उत्तम राहील.

Mithun | saam tv

कर्क

कुटुंबीयांच्या बरोबर आनंदी क्षण खर्च कराल. सहवासाचे सुख लाभेल. आर्थिक व्यवहारांमध्ये मनाजोगा बदल होईल. दिवस चांगला आहे.

kark | saam tv

सिंह

जिद्द आणि चिकाटी हे गुण आपल्या राशीचे जणू कणा आहेत. वेगळे सांगण्याची गरज नाही. आज मात्र आपला पराक्रम उत्कृष्ट पातळीवर असेल.

सिंह | Saam Tv

कन्या

झालेल्या गोष्टींचा विचारही अधिक कराल. पण आज चार सुखाचे क्षण झोळीत येणार आहेत. गृहसौख्य, वाहनसौख्य याला दिवस उत्तम आहे.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

संतती हीच संपत्ती आहे हे आपल्याला कळून चुकले आहे. अवघड असणाऱ्या गोष्टी आज लीलाया पार पाडाल. विशेष उपासना सुद्धा करावी.

तूळ | saam tv

वृश्चिक

रोग, आजार जणू काही पाचवीला पुजले आहेत अशा काही गोष्टी आज तुम्हाला वाटून जातील. एका मागे एक येणाऱ्या संकटांनी जीवाची ओढाताण होईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

जोडीदाराचे मन जपण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसाय आणि संसार या दोन्हींच्या जबाबदाऱ्या आज पेलताना त्रेधा तिरपीट उडेल.

Dhanu Rashi | Yandex

मकर

सासरवाडीकडून धन योगाचे लाभ दिसत आहेत. अचानक घबाड मिळाल्यासारखे पैसे आज आपल्याला मिळतील.

मकर | Saam Tv

कुंभ

मनाचा कोपरा आज भारलेला असेल. भगवंताच्या भेटीसाठी विशेष ओढ वाटेल. आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचा आनंद लुटाल.

कुंभ | Saam Tv

मीन

एक अधिक एक बरोबर दोन असे आयुष्य खरे तर नसते. अनेक डगरींवर पाय ठेवून जावे लागते. कर्माचा लेखाजोखा चांगला राहील.

Meen | Saam Tv

NEXT : मऊ लुसलुशीत पाटवडी बनवण्याची झटपट अन् सोपी पद्धत

Easy Soft Patwadi Recipe | google
येथे क्लिक करा