Sakshi Sunil Jadhav
बेसन, आलं-लसूण पेस्ट,हळद,तिखट, धने-जिरे पूड, मीठ,तेल, पाणी, कोथिंबीर इ.
सर्वप्रथम बेसन चाळून घ्या जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत.
बेसनात हळद, तिखट, धने-जिरे पूड, आले-लसूण पेस्ट आणि मीठ मिक्स करा.
पाणी घालून त्यामध्ये घट्ट पीठासारखा गोळा तयार करा. मिश्रण खूप पातळ करू नका.
आता एका कढईत पाणी तापवा, त्यात हा बेसनाचा घोळ घाला. सतत हलवत शिजवा, मिश्रण घट्ट होत जाईल.
तेल लावलेल्या ताटात किंवा प्लेटमध्ये पसरवा. थोडे थंड झाल्यावर चाकूने काप करा.
चौकोनी किंवा त्रिकोणी पाटवड्या कापा, त्यावर कोथिंबीर पसरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.