Sakshi Sunil Jadhav
पितृपक्षात नैवेद्यात सात्त्विक पदार्थ ठेवले जातात. वरणभात, खीर, पोळी, पुरी, भाज्या, फळं असे पदार्थ यात असतात. पुढे आपण याव्यतिरिक्त कोणते पदार्थ ठेवू शकतो आणि त्याचे नियम काय याबद्दल जाणून घेणार आहोत.
पितृपक्षात गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या नैवेद्यात ठेवता येतात.
पितृपक्षात शिरा किंवा साजूक तुपातला हलवा गोड नैवेद्य म्हणन ठेवला जातो.
पितरांना अर्पण करण्यासाठी खीर शुभ मानली जाते.
घरच्या घरी केलेली पोळी नैवेद्यात ठेवणे योग्य आहे. मुळात संपूर्ण नैवेद्य हा घरी तयार केलेला असावा.
काही विशिष्ट जाती, समुदाय किंवा कुटुंबांमध्ये पितृ श्राद्ध विधीमध्ये पितरांच्या आवडीनुसार मांसाहारी पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे.
मांसाहारी पदार्थ हे सहसा विशेष श्राद्ध किंवा वार्षिक श्राद्ध करताना होते. मात्र पितृपक्षातील दैनिक श्राद्ध विधी साधारणपणे सात्त्विक अन्नानेच केला जातो.
जर कुटुंबात पारंपरिक रीत अशी असेल, तर वार्षिक श्राद्ध किंवा पितृपक्ष संपल्यावरच्या दिवशी नॉन-व्हेज नैवेद्य दिला जातो.