Sakshi Sunil Jadhav
बार्वी हिल्स हे सप्टेंबरमहिन्यात फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे. तुम्ही जर जंगल रोड ट्रीप करण्यासाठी उत्सुक असाल तर या ठिकाणाची माहिती जाणून घ्या.
बार्वी हिल्सजवळ तुम्ही सुंदर आणि वळणदार रस्ते, पक्षी, फोटोग्राफीसाठी उत्तम स्पॉट्स, हिरवेगार जंगल आणि बार्वी धरण पाहता येईल.
बार्वी हिल्सचा रस्ता सह्याद्री पर्वत रांगेच्या कुंडलीत वळण घेत जातो, ज्यामुळे प्रवासादरम्यान निसर्गाचे सुंदर दृश्य दिसते.
येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला मुंबई – ठाणे – बेलापूर – शिलफाटा – बदलापूर – बार्वी हिल्स हा रोडचा मार्ग निवडावा लागेल.
बार्वी धरण बदलापूरपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे, जिथे फोटोग्राफी आणि शांततेचा अनुभव घेता येतो.
बार्वी हिल्स मुंबईपासून सुमारे ८० ते ९० किमी अंतरावर आहे.
या जंगल मार्गावरून जाताना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो, मानसिक विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण आहे.