Sakshi Sunil Jadhav
चंद्र हा मनाचा कारक म्हटला आहे. आज तुमच्या चतुर्थस्थानामधून चंद्राचं भ्रमण मनस्वास्थ्य उत्तम देईल. सर्व सुखांचे आगमन होईल. घरी पाहुणे येतील.
कामाच्या निमित्त प्रवास होतील. गाड्यांविषयी विशेष प्रेम आणि आकर्षण वाटेल.कलाक्षेत्रात, वक्तृत्व क्षेत्रात, लेखन, प्रकाशन या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाला उत्तम वाव मिळेल.
आपली रास अल्लड जरी असली तरी व्यवहार उत्तम समजतात. आज व्यवसायाशी निगडित महत्त्वाची कामे होतील. घरातील वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढे जाल.
आपला मनोदय हा कायमच चांगला असतो.इतरांना आपल्याकडून कोणी दुखावून जाऊ नये याची तुम्ही नेहमी काळजी घेता किंवा चुकून झाले तर मनाला लागते. खरेदीमध्ये आनंद लुटाल.
खोटा मोठेपणा कधी कधी आपल्याला नडतो. कोणाशी कसे वागायचे आज हे अगदी अभ्यासुनच तुम्हाला वर्तन करावे लागेल. चुकीच्या गोष्टींमध्ये अडकू नका. मनस्ताप वाढतील.
मित्र-मैत्रिणींमध्ये ऊठबस होईल. आपले सहकारी स्नेहजन यांना बरोबर घेऊन जाण्याचे योग आहेत. काही महत्त्वाच्या कामासाठी आपल्याजवळचे लोक आपल्या सल्ला मागतील आणि त्याचे योग्य समुपदेशन तुम्ही कराल.
आपल्या करिअरमध्ये एक वेगळी उंची आज आपण गाठाल. ठरवलेली काम त्याच पद्धतीने आणि त्याच दिशेने आज होतील. काही मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा अंगावर येऊन पडतील.
कुलस्वामिनीची उपासना आज आपण करावी. त्याचे विशेष फल आपल्याला मिळेल. मनामध्ये नसताना अंदाज नसताना चांगल्या घटना आज घडणार आहेत.
एखादी कोणती तरी मोठी गोष्ट करण्याचे ध्येय अंगी बाळगून आज पुढे जा. कोणी नसले तरी एकटेच यामध्ये सरसावाल.
कोर्टाच्या कामामध्ये आज आपण बाजी मारणार आहात. नको असणाऱ्या गोष्टींचा ससेमीरा मागे लागला असेल तर आज त्यामधून सुटका होण्याचे संकेत दिसत आहेत. एखादी चिकाटी आणि ध्येय या उद्देशाने पुढे जाल.
तब्येतीसाठी आजचा दिवस काही संकेत घेऊन आला आहे. हाडांचे दुखणे, संधिवात वात विकार यांची आज विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
प्रेमामध्ये आज आपण बाजी मारणार आहात. अनेक दिवस रटाळ चाललेला दिवस आज अचानक सोनेरी वलय घेऊन येईल. आनंदाला आणि सुखाला पारावर उरणार नाही.