Eyebrow Care: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट

Sakshi Sunil Jadhav

सलूनमध्ये झालेली चूक

कधी तरी आरशासमोर जास्त वेळ घालवून किंवा सलूनमध्ये चुकीच्या ट्रिमिंगमुळे भुवया जास्त प्लक होतात. त्याने तुमचा चेहरा वेगळा दिसतो.

eyebrow regrowth care

टेन्शन सोडा

आता काळजी करू नका! थोडा संयम आणि योग्य काळजी घेतल्यास त्या पुन्हा नैसर्गिकपणे वाढवता येतात. त्यासाठी तुम्हाला पुढील काही सोपे उपाय करावे लागतील. त्याने काहीच दिवसात तुमचे आयब्रो जाड होतील.

eyebrow regrowth care

भुवया प्लक करणे थांबवा

भुवया जास्त प्लक झाल्या असतील, तर सर्वात आधी पिन्सेट बाजूला ठेवा. नवीन केस वाढण्यासाठी त्यांना वेळ द्या. कमीत कमी 3 ते 4 महिने कोणताही प्लकिंग टाळा. कारण हे केस वाढायला वेळ हवा असतो.

eyebrow regrowth care

आयब्रो ग्रोथ सिरम वापरा

बायोटिनयुक्त ग्रोथ सिरम जसे Vegamour vegaBROW Volumizing Serum हे भुवयांची जलद गतीने वाढ होण्यासाठी मदत करतं. हे नैसर्गिक घटकांपासून बनलेले असल्याने जास्तवेळ टिकतं आणि लवकर परिणाम होतो.

eyebrow regrowth care

तेलाने भुवया हायड्रेट ठेवा

भुवयांच्या त्वचेवर दररोज रात्री कॅस्टर ऑइल, बदाम तेल किंवा नारळ तेल कापसाने लावा. त्यामुळे केस तुटणे व गळणे कमी होते आणि वाढ नैसर्गिक राहते.

eyebrow regrowth care

रोझमेरी तेलाचा वापर करा

रोझमेरी तेल केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा वाढवतं. त्यामुळे नवीन केस वाढतात आणि भुवया दाट होतात.

eyebrow regrowth care

दररोज आयब्रो ब्रश करा

दररोज काही वेळा स्वच्छ स्पूली ब्रशने भुवया ब्रश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांना पोषण मिळतं.

eyebrow regrowth tips

पाणी आणि योग्य आहार घ्या

दररोज पुरेसे पाणी प्या. तसेच व्हिटॅमिन A, B6, C, E आणि पौष्टीक अन्न खा. जसे की अंडी, सुकामेवा, गाजर आणि हिरव्या भाज्या. हे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल.

eyebrow regrowth tips

केसांच्या वाढीस अडथळा आणणारी प्रोडक्ट्स

अल्कोहोलयुक्त आयब्रो जेल्स, जड वॅक्स पेंसिल्स किंवा क्लॉगिंग करणारे मेकअप प्रोडक्ट्स वापरू नका. ही उत्पादने केस कमकुवत करतात आणि वाढ थांबवतात.

eyebrow regrowth tips

पावडरचा वापर करा

आयब्रो करताना ब्रोज पावडर वापरा. हे केसांना नुकसान न करता नॅचरल लुक देतात. पॅराबेन आणि सल्फेटमुक्त प्रोडक्ट्स निवडा.

eyebrow regrowth tips

NEXT: कोणत्या कामासाठी संपूर्ण संपत्तीचा त्याग करावा? चाणक्यांनी केला होता गंभीर खुलासा

Chanakya Niti
येथे क्लिक करा