Dhanshri Shintre
कोबी ६५ हा चिकन ६५ वरून प्रेरित एक चविष्ट आणि खमंग असा साउथ इंडियन फुलकोबीचा तळलेला नाश्ता आहे.
दक्षिण भारतात फ्लॉवर ६५ हा एक लोकप्रिय स्टार्टर आहे, जो रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत आवडीने ऑर्डर केला जातो.
फ्लॉवर, गव्हाचे व तांदळाचे पीठ, मीठ, लसूण पेस्ट, गरम मसाला, काळीमिरी पावडर, तेल.
२ कप फ्लॉवरची फुले नीट धुवून घ्या आणि नंतर ती थोड्या गरम पाण्यात काही वेळ भिजत ठेवा
गव्हाचे व तांदळाचे पीठ, मीठ, लसूण पेस्ट, गरम मसाला आणि काळीमिरी पावडर एकत्र करून मिश्रण तयार करा.
१ चमचा लाल तिखट, थोडं तेल आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा व ती तयार पिठाच्या मिश्रणात घाला.
सर्व साहित्य नीट मिसळून जाडसर पीठ तयार करा. चव तपासा ते किंचित खारट असणं गरजेचं आहे.
एका वाटीत फ्लॉवरचे छोटे तुकडे घ्या, त्यावर तयार केलेले मिश्रण नीट लावून सर्व तुकडे माखून घ्या.
जाड बुडाच्या पॅनमध्ये तेल गरम करा, नंतर पीठाचे थोडेसे भाग टाकून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळलेले फ्लॉवर ६५ टिश्यू पेपरवर किंवा स्टील चाळणीत काढा, जास्तीचं तेल निघू द्या आणि सर्व्ह करा.