Dhanshri Shintre
महाराष्ट्रीयन काकडी थालीपीठ ही एक आरोग्यदायी डिश आहे, जी काकडी, गव्हाच्या पीठाचा आणि चवदार मसाल्यांचा वापर करून तयार केली जाते.
हे थालीपीठ नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात भाजीबरोबर खाण्यासाठी उत्तम पर्याय असून, चविष्ट आणि पोषणमूल्यांनी भरलेले आहे.
काकडीचा किस, लाल तिखट, जिरेपूड, हळद, गव्हाचे व तांदळाचे पीठ, बेसन, ओवा, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि तेल या साहित्यांनी थालीपीठ तयार होते.
काकडी स्वच्छ धुवा आणि त्याचा देठाचा भाग व्यवस्थित कापून तयार करा.
काकडी स्वच्छ धुवून त्याचा किस करून थालीपीठासाठी तयार ठेवा.
एका भांड्यात काकडीचा किस, लाल तिखट, हळद, ओवा, जिरेपूड, लसूण आणि मीठ एकत्र करून चांगले मिसळा.
मिश्रणात गव्हाचे, तांदळाचे पीठ आणि बेसन घालून नीट एकजीव करून घट्टसर पीठ तयार करा.
पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून पुढील प्रक्रियेसाठी तयार ठेवा.
पोलपाटावर ओला रुमाल ठेऊन त्यावर पीठाचा गोळा ठेवून थालीपीठ चांगल्या प्रकारे थापा.
तव्यावर तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजूंनी चांगले भाजून, सुगंधी आणि सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.
हीच पद्धत वापरून स्वादिष्ट आणि पौष्टिक काकडीचे थालीपीठ तयार झाले आहे सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.