ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चणाडाळ,उडीद डाळ मुंगडाळ, हिरवी मुगडाळ, आले मिरची लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, हळद, मिरची पावडर, धना पावडर, मीठ, चीज, तेल
सर्वप्रथम पाच-सहा तास सगळ्या डाळी स्वच्छ धुवा आणि भिजवून घ्या.
त्यानंतर भिजलेली डाळीतील पाणी काढून मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करा.
तयार पेस्टमध्ये कांदा, टोमॅटो आणि आले मिरची लसूणाची पेस्ट घालून निट मिक्स करूण घ्या
आता बॅटरमध्ये लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ टाकून घ्या.
त्यानंतर पॅनमध्ये तेल पसरून त्यामध्ये तयार बॅटर गोल पसरून घेऊ त्यावर चीज क्रश करून टाका.
चिला दोन्ही बाजून खरपूस क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या. तयार चिली चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.