Dhanshri Shintre
भारतातील बहुतांश लोकांना रस्त्यावर मिळणारे चविष्ट स्ट्रीट फूड खाणं अधिक आवडतं आणि ते त्यांची पहिली पसंती असते.
जर तुम्ही शाकाहारी असाल आणि स्ट्रीट फूडचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी अनेक स्वादिष्ट पर्याय उपलब्ध आहेत.
आज आपण भारतातील काही असे खास स्ट्रीट फूड्स पाहणार आहोत, ज्यांची चव तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल.
भारत हे फक्त प्रवासासाठीच नव्हे तर विविध स्वादांनी भरलेल्या स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीसाठीही एक उत्तम गंतव्यस्थान मानले जाते.
मुंबईची खास ओळख असलेली पावभाजी हे अत्यंत चवदार स्ट्रीट फूड असून, ती शहराचा अभिमान मानली जाते.
कुरकुरीत आलू टिक्कीला दही, चणे आणि मसाले घातल्यावर त्याची चव अप्रतिम होते, एकदा नक्की चाखून पाहा.
मसाला डोसा आणि इडली हे दक्षिण भारतीय पदार्थ आता देशभर लोकप्रिय असून, प्रत्येकाला त्यांचा स्वाद आवडतोच.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.