Liver Health: लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय

Dhanshri Shintre

फळे आणि भाज्या

फळे व भाज्यांतील अँटीऑक्सिडंट्स यकृताचे संरक्षण करतात, त्यामुळे हिरव्या भाज्या आणि रसाळ फळे आहारात घालावीत.

धान्य

संपूर्ण धान्यांतील फायबर पचनक्रिया सुधारते आणि यकृताचे आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोजच्या आहारात जरूर घ्या.

डाळी

डाळींत असलेले प्रथिने व फायबर यकृतासाठी फायदेशीर असतात, त्यामुळे रोज एकदा तरी डाळी खाणे आवश्यक आहे.

नट्स आणि बिया

नट्स आणि बिया यामध्ये असलेली चांगली चरबी व अँटीऑक्सिडंट्स यकृतासाठी फायदेशीर ठरतात, आहारात आवर्जून घ्या.

मासे

माशांतील ओमेगा-३ फॅटी अॅसिड यकृताच्या सूजेस कमी करतात, म्हणून आहारात मासे नियमितपणे समाविष्ट करावेत.

ग्रीन टी

ग्रीन टीतील अँटीऑक्सिडंट्स यकृताचे संरक्षण करतात आणि हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून ते सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

कॉफी

थोड्याशा प्रमाणात कॉफी पिणे यकृतासाठी फायदेशीर असते, मात्र अति सेवन आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते.

NEXT: ग्रीन टीमध्ये लिंबू आणि मध घालण्याचे ८ आरोग्यासाठी फायदेशीर परिणाम

येथे क्लिक करा