Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार तुमचीही आर्थिक स्थिती खराब असेल तर काही उपाय केले पाहिजे.
लक्ष्मीला धनाची देवी म्हंटले जाते. शुक्रवार हा वार माता लक्ष्मीचा असल्याने या दिवशी पूजा केल्याने विशेष कृपा मिळते.
शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जाते.यामुळेच घरात शंखाची पूजा केल्याने घरामध्ये लक्ष्मी नांदते.
नारळ म्हणजेच श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फळ आहे. म्हणूनच जेव्हा माता लक्ष्मीची पूजा केली जाते तेव्हा नारळ अर्पण करतात.
धार्मिक मान्यतेनुसार, कमळाच्या फुलाच्या मध्यभागी देवी लक्ष्मी वास करते. म्हणूनच माता लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण करावे
पिंपळाचे झाड हे घरामध्ये लावले जात नाही ते बाहेर, अंगणात लावावे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो.
घरामध्ये तुळशीचे रोप असावे. रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी घालावे.
घरामध्ये असणाऱ्या झाडूमध्ये माता लक्ष्मीचे रूप वास करत असते. घरातील अडथळा दूर करण्यासाठी झाडू मदत करते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.