Saam Tv
घरच्या घरी दुधाच्या मलाईने तूप बनवण्यासाठी दुधाची मलाई आणि कुकरची आवशक्ता आहे.
सर्वप्रथम कुकरमध्ये मलई आणि 2 कप पाणी टाकून चांगले मिक्स करा.
त्यानंतर कुकरचं झाकण लावून चांगल्या २ ते ३ शिट्या होईपर्यंत मध्यम आचेवर ठेवा.
कुकरचं प्रेशर सुटल्यावर झाकण उघडा आणि गॅस फ्लेम मोठी करून चमच्याने ढवळत राहा.
थोड्यावेळानी त्याचा रंग बदलेल. रंग बदल्लयानंतर तयार तूप गाळून घ्या.
तूप तुम्ही कोणत्याही टाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता.
बाजारात मिळणाऱ्या भेसळ तुपाऐवजी घरच्या घरी तूप बनवा.