Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि दमटपणा वाढल्याने त्वचेतील तेलग्रंथी अधिक एक्टिव्ह होऊ शकतात. त्यामुळे त्वचेवर अतिरिक्त सेबम (Sebum) जमा होऊन चेहरा चिकट दिसू लागतो. यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन पिंपल्स आणि पुरळ येण्याचा धोका वाढू शकतो.
त्वचेवर जास्त तेल साचल्यास धूळ, घाण आणि प्रदूषणाचे कण त्वचेवर चिकटून राहू शकतात. त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊन पिंपल, ब्लॅकहेड्स आणि त्वचेला खाज येण्याची शक्यता वाढते. म्हणून पावसाळ्यात त्वचेची नियमित स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे.
टी ट्री ऑईलमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्यास आणि मुरुमांना कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांची वाढ कमी करण्यास मदत करू शकतात.
लॅव्हेंडर ऑईलमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास आणि त्वचेला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. नियमित स्किनकेअरमध्ये योग्य प्रमाणात वापरल्यास त्वचेवर ग्लो येण्यासही मदत मिळते.
लॅव्हेंडर ऑईलही इतर इसेन्शियल ऑईल्सप्रमाणे थेट त्वचेवर लावू नये. ते मॉइश्चरायझर किंवा कॅरिअर ऑईलमध्ये मिसळूनच वापरण्याची शिफारस केली जाते. योग्य प्रमाणात वापर केल्यास त्वचेला पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.
इसेन्शियल ऑईल्स Concentrated असल्यामुळे त्यांचा वापर नेहमी काळजीपूर्वक करावा. संवेदनशील त्वचा, अॅलर्जी किंवा इतर त्वचारोग असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्यांचा वापर करावा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.