Hair loss: केस गळतीने हैराण? दररोज खा ६ पदार्थ खा, काही दिवसांतच दिसेल फरक!

Surabhi Jayashree Jagdish

केस गळती

आजकाल केस गळतीचं प्रमुख कारण म्हणजे शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता, वाढता ताण आणि अनियमित जीवनशैली आहेत. आयन, प्रोटीन, बायोटिन आणि जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास केसांच्या मुळांना पुरेसं पोषण मिळत नाही.

Hair growth | saam tv

अंडी

अंडी ही उच्च दर्जाच्या प्रोटीनचा आणि बायोटिनचा उत्तम स्रोत मानली जातात. प्रोटीन केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात तर बायोटिन केस मजबूत ठेवण्यास मदत करतात. नियमित प्रमाणात अंडी खाल्ल्यास केसांच्या मुळांना बळकटी मिळून केस गळती कमी होण्यास मदत होऊ शकते.

Healthy hair | saam tv

पालक

पालकामध्ये लोह, जीवनसत्त्व A आणि जीवनसत्त्व C मुबलक प्रमाणात असतं. लोहामुळे टाळूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होण्यास मदत होते आणि केसांच्या वाढीस आधार मिळतो. तसंच जीवनसत्त्वं टाळूचं आरोग्य सुधारून केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Hair care | saam tv

रताळे

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतं. ज्याचं शरीरात जीवनसत्त्व A मध्ये रूपांतर होतं. जीवनसत्त्व A टाळू निरोगी ठेवण्यास आणि केसांच्या नैसर्गिक वाढीस मदत करते. मात्र, जीवनसत्त्व A चे अतिसेवन टाळावे आणि संतुलित प्रमाणातच रताळ्याचा आहारात समावेश करावा.

Biotin foods | saam tv

सुका मेवा

बदाम, अक्रोड आणि इतर सुका मेवा हे ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि जीवनसत्त्व E चे चांगले स्रोत आहेत. हे घटक केसांना पोषण देऊन त्यांची चमक आणि मजबुती टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Iron rich foods | saam tv

मसूर डाळ

मसूर डाळीत प्रोटीन, लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. हे पोषक घटक केसांच्या मुळांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. संतुलित आहारात मसूर डाळीचा समावेश केल्यास केस मजबूत राहण्यास आणि गळती कमी होण्यास मदत होऊ शकते.

Dry fruits for hair | saam tv

ॲव्होकॅडो

ॲव्होकॅडोमध्ये आरोग्यदायी फॅट्स आणि जीवनसत्त्व E भरपूर असते. हे घटक टाळूला ओलावा टिकवून ठेवण्यास आणि केस अधिक लवचिक व मजबूत बनवण्यास मदत करतात. त्यामुळे केस कोरडे पडणे, तुटणे आणि गळणे कमी होण्यास हातभार लागू शकतो.

Scalp health | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

Natural hair care | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

persistent leg pain | SAAM TV
येथे क्लिक करा