Shreya Maskar
तिरंगा स्पेशल सँडविच बनवण्यासाठी ब्रेड स्लाईस, मेयोनीज, कोबी, गाजर, शेजवान सॉस, पुदिन्याची चटणी, बटर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
तिरंगा स्पेशल सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये किसलेला कोबी, गाजर, मेयोनीज आणि मीठ घालून मिक्स करा.
आता ब्रेडला शेजवान सॉस लावून सर्व मिश्रण पसरवून घ्या.
दुसऱ्या ब्रेडला मस्त बटर लावून घ्या.
शेवटच्या तिसऱ्या ब्रेडला पुदिन्याची चटणी लावून घ्या.
आता या प्रत्येक लेअरमध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ टाका.
तिन्ही लेकर एकावर एक ठेवून सँडविच कव्हर करून घ्या.
वरून न विसरता सँडविचवर चीज घाला.
चटपटीत सँडविच टोमॅटो सॉस आणि पुदिना चटणीसोबत खाऊ शकता.