Shreya Maskar
मटार उसळ बनवण्यासाठी मटार, खोबरे, कांदा, काजू आणि तेल इत्यादी पदार्थ लागतात.
उसळसाठी आले, लसूण, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, मीठ, साखर आणि धणे- जिरे पावडर इत्यादी साहित्य लागते.
मटार उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आले, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदीना, खोबरे, काजू, कांदा मिक्सरमध्ये वाटून त्यांची पेस्ट करुन घ्या.
आता फोडणीसाठी पॅनमध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून मिक्स करून घ्या.
फोडणीत उकडलेले मटार आणि मसाल्यांची पेस्ट घालून थोडे पाणी टाकून छान मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात धणे-जिरे पावडर, मीठ आणि साखर घालून एक उकळी काढून घ्या.
मिश्रणात तळलेले काजू, कांदा, खोबरे घालून छान ग्रेव्ही करून घ्या.
शेवटी न विसरता पुदिना आणि कोथिंबीर घालून उसळचा आस्वाद घ्या.